24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमनोरंजन‘आठवा रंग प्रेमाचा’ चित्रपटात झळकणार रिंकू

‘आठवा रंग प्रेमाचा’ चित्रपटात झळकणार रिंकू

एकमत ऑनलाईन

मुंबई : आर्ची म्हणून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी आणि पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना सैराट करून सोडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर रिंकूने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. ‘सैराट’नंतर रिंकू ‘कागर’, ‘मेकअप’अशा काही चित्रपटांसह वेबसीरिजमध्येही झळकली. विशेष म्हणजे येत्या जून महिन्यात रिंकू पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रिंकूने अलीकडेच तिच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तिने तिच्या नव्या चित्रपटाची आणि तिच्या भूमिकेची चाहत्यांना ओळख करून दिली आहे.

रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तिचा चित्रपटातील लूकदेखील रिव्हील करण्यात आला आहे. सोबतच ती कोणती भूमिका साकारणार हेदेखील तिने सांगितले आहे. रिंकू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या