26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजन‘लायगर’च्या कमाईत दुस-या दिवशी मोठी घसरण

‘लायगर’च्या कमाईत दुस-या दिवशी मोठी घसरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडा याच्या ‘लायगर’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. पण दुस-या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.

लायगर या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी ३३.१२ कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुस-या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत जवळपास ५० टक्के घसरण झाली आहे. या चित्रपटाने दुस-या दिवशी बॉक्स ऑफिसवर १६ कोटींची कमाई केली आहे.

विजय देवरकोंडाने ‘लायगर’ या चित्रपटामध्ये फायटरची भूमिका साकारली आहे. चित्रपटामधील विजयच्या फिटनेसचे अनेक जण कौतुक करत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेने विजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे.

रोनित रॉय, राम्या कृष्णन आणि माईक टायसन या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन’ माईक टायसनचा ‘लायगर’ चित्रपटामधील कॅमिओ देखील चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी ५ संगीत दिग्दर्शकांनी मिळून, संगीत दिले आहे.

लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरने केली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी ‘लायगर’ या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी रिलीज झाली. या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.

‘लायगर’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली. समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंधाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या