25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमनोरंजनसगळीकडे निशिकांत कामतच्या निधनाची अफवा

सगळीकडे निशिकांत कामतच्या निधनाची अफवा

एकमत ऑनलाईन

अभिनेता रितेश देशमुख नंतर दिग्दर्शक मिलाप झवेरीनेदेखील हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले

 हैदराबाद  : अजय देवगणचा चित्रपट दृश्यमचा दिग्दर्शक निशिकांत कामतच्या निधनाची अफवा सगळीकडे पसरत आहे. या वृत्तात तथ्य नसल्याचे अभिनेता रितेश देशमुखने सांगितल्यानंतर आता दिग्दर्शक मिलाप झवेरीनेदेखील हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर निशिकांत कामतच्या निधनाची माहिती दिली होती पण नंतर आणखीन एक पोस्ट शेअर करत निधन झाले नसून व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत यकृताशी संंबंधित आजाराशी सामना करत आहे आणि त्याच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिलाप झवेरीने पहिले ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, दुःखद बातमी आहे की निशिकांत कामतचे निधन झाले. त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये माझ्या पहिल्या नाटकाचे परीक्षण केले होते. त्यांनी मला सर्वोत्कृष्ट अभिनेता व लेखकाचा पुरस्कार दिला होता. ते अभिषेक बच्चन अभिनीत सनक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. दुःखद आहे की हा चित्रपट होऊ शकला नाही, आम्हाला नेहमी तुमची आठवण येईल. त्यानंतर लगेचच त्याने दुसरे ट्विट करत सांगितले की निशिकांत कामत यांचे निधन झाले नाही. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत.

त्याने ट्विटमध्ये लिहिले की, मी आता कुणाशीतरी बोललो आहे जे निशिकांत यांच्यासोबत रुग्णालयात आहेत. त्यांचे निधन झाले नाही. ते आता क्रिटिकल आहेत. जीवन आणि मृत्यूमध्ये लढत आहे पण अजून जिवंत आहे.निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. याशिवाय, ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या