27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमनोरंजनअभिनेते रसिक दवे यांचे निधन

अभिनेते रसिक दवे यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ‘बालिका बधू २’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री केतकी दवेचा नवरा अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झाले. किडनी खराब झाल्याने त्यांचे निधन झाले असून वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.

अभिनेते रसिक दवे गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. रसिक दवे यांची किडनी खराब झाली होती. गेल्या एक महिन्यापासून त्यांना हा त्रास सुरू झाला होता. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने गेल्या १५ दिवसांपासून ते रुग्णालयातच होते. शुक्रवारी अखेर त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. रसिक दवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबासाठी हा खूपच कठीण काळ आहे. त्यांचे चाहतेही खूप दु:खी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

रसिक दवे यांनी हिंदी आणि गुजराती मालिका आणि कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. रसिक दवेने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्री केतकी दवेसोबत लग्न केले होते. केतकी आणि रसिकची जोडी ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसली होती. या दोघांचाही हिंदी आणि गुजरातीमध्ये मोठा चाहता वर्ग आहे.

दरम्यान, रसिक यांनी ‘पुत्र वधू’ द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली आणि गुजराती आणि हिंदी दोन्ही माध्यमात काम केले. ‘मासूम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर रसिकने ‘संस्कार : धरोहर अपना.. ’ या टीव्ही मालिकेद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले. सीआयडी, महाभारत, अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.. याशिवाय त्यांनी गुजराती मालिका, नाटकांमध्येही काम केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या