मुंबई : सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील आपल्याच लोकांना पुढे करणारे कलाकार, टोळकेबाजी यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यप याने सलमान खान, त्याचे भाऊ आणि वडील यांच्यावर करिअर खराब केल्याचा आरोप केला होता. अभिनवने यासाठी एक भलीमोठी पोस्ट लिहिली होती. यावर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी उत्तर दिलं आहे.
‘हे आम्हीच सगळं खराब केलं आहे. पहिले जाऊन त्यांचे सिनेमे पाहा,
बॉम्बे टाईम्सला सलीम खान यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अभिनव कश्यप याच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘हे आम्हीच सगळं खराब केलं आहे. पहिले जाऊन त्यांचे सिनेमे पाहा, मग आपण बोलू’ असं सलीम खान यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की ‘त्यांनी माझे नाव घेतले, बहुतेक त्यांना माझ्या वडिलांचे नाव माहिती नसावे, माझ्या वडिलांचे नाव राशिद होते. आमच्या आजोबा पणजोबांचेही नाव त्यांनी घ्यायला हवे होते.’ त्यांना जे करायचं ते करु द्या त्यांनी जे काही म्हटलंय त्यावर मी प्रतिक्रिया देऊन माझा वेळ खराब करू इच्छित नाही असं सलीम खान यांनी म्हटलं आहे.
अभिनव कश्यप याने सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दबंग’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 2010 साली प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने खान कुटुंबाने आपले करिअर उध्वस्त केले असा आरोप केला आहे. आपल्यावर खान कुटुंबाची खुन्नस असल्याचाही कश्यपने आरोप केला होता. सलमान खानने बेशर्म हा रणबीर कपूरची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते असाही आरोप केला आहे.
Read More अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या