30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन सलमान न्यायालयात गैरहजर

सलमान न्यायालयात गैरहजर

एकमत ऑनलाईन

जोधपूर : सलमान खान सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या प्रचंड व्यस्त आहे. पण त्याच्यावर एकेकाळी झालेल्या आरोपांमधून अजूनही त्याची सुटका झालेली नाही. काळवीट शिकारप्रकरणी मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजी सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली.

न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून, पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. काळवीट शिकारप्रकरणी राजस्थानच्या सेशन कोर्टामध्ये सलमानची सुनावणी होती. सलमानने स्वत: तिथे उपस्थित राहणे आवश्यक होते. पण मुंबई आणि राजस्थानमध्ये कोरोना भरपूर वाढला आहे. त्यामुळे हा धोका मी पत्करु शकत नाही.

असे कारण देत सलमानने तिथे जाण्याचे टाळले. विशेष म्हणजे, सलमान खानला ५ एप्रिल २०१८ रोजी या प्रकरणात दुय्यम कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सलमानने शिक्षेविरोधात जिल्हा आणि सत्र जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. त्याचबरोबर आर्म्स ऍक्ट प्रकरणात सलमानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने एक आव्हान दिले आहे. आज या दोन्ही खटल्यांची सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.

पिंपळा खुर्द येथील स्वस्तधान्य दुकानाची पथकाकडून तपासणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या