26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमनोरंजनसारा अली खानवर सलमान नाराज

सारा अली खानवर सलमान नाराज

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान सगळ्यांचाच लाडका भाईजान आहे. ना केवळ चाहते, पण मोठमोठे दिग्गज सेलिब्रिटी देखील त्याच्या प्रेमात आहेत. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यामध्ये सारा अली खान भर कार्यक्रमात त्याला ‘अंकल’ म्हणून संबोधते.
सारानं ‘अंकल’ म्हटल्यावर सलमानची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी आहे.

तो देखील बोलताना दिसतोय-‘तुझ्या हातातून सिनेमा तर गेला’ हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात सलमान खान आणि सारा अली खान एकत्र स्टेज शेअर करताना दिसत आहेत. सारा बोलताना दिसत आहे कि ती एक ब्रॅन्ड लॉंच करण्याच्या विचारात आहे. ती पुढे म्हणते,‘सलमान अंकलसोबत’. हे ऐकून दबंग खान उत्तरादाखल म्हणतो कसा, तुझ्या हातातून सिनेमा तर गेला. हे ऐकून सारा जरा खट्टू होते.. आणि विचारते,ह्यााझ्या हातातून सिनेमा का गेला?

तेव्हा सलमान म्हणतो, तु सगळ्यांसमोर मला अंकल म्हटलंस . मग काय सारा देखील गप्प बसत नाही आणि म्हणते, तुम्हीच मला ‘अंकल’ म्हण असं म्हटलं होतं मागे.. मग दोघंही एकमेकांची थट्टा-मस्करी करत टन टना टन गाण्यावर धमाल डान्स करतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या