मुंबई : भारतीय महिला बॉक्सर निकहत जरीनने इतिहासच रचला. जागतिक बॉक्ंिसग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदक पटकावले आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची निकहत जबरदस्त फॅन आहे. एकदा एका मुलाखतीत तिने सलमान खानला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. मुलाखतीत ती सलमानची किती चाहती आहे, हेही सांगितले. तो व्हीडीओ व्हायरल होऊन सलमानपर्यंत पोहोचला होता. आता भारतासाठी एवढी मोठी कामगिरी करणा-या निकहतचे अभिनंदन सलमानने केले आहे.
एका मुलाखतीत निकहत जरीनने सलमान खानला आपला जान म्हटले होते. ती म्हणाली, ‘मी सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. माझं स्वप्न आहे की मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावं आणि मुंबईला पोहोचल्यावर पहिलं सलमानला भेटावं.’ गुरुवारी ५२ किलोग्रॅम कॅटेगरीत निकहतने थायलंडच्या जिटपॉन्ग जुटामसला ५-० ने हरवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निकहतचे अभिनंदन केले.
सलमान खान म्हणाला, या सुवर्ण पदकासाठी निकहत तुझे अभिनंदन. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर फॅन्सनी निकहत जरीनच्या जुन्या ट्विट्सलाही शेअर केले.