22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमनोरंजनसलमान खान ‘दबंग ४’साठी सज्ज

सलमान खान ‘दबंग ४’साठी सज्ज

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या चौथ्या चित्रपटासह दबंग ४ फ्रेंचायझीमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. या फ्रेंचायझीचे आतापर्यंत ३ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

या चित्रपटातून पुन्हा एकदा सलमान खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाबाबत अनेक बातम्या समोर आल्या असल्या तरी आता या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तिग्मांशू धुलिया यांच्या खांद्यावर येऊ शकते अशी चर्चा आहे.

ब-याच दिवसांपासून ‘दबंग ४’ बद्दल बातम्या येत आहेत की चित्रपटाच्या कास्टिंग आणि स्क्रिप्टवर काम केले जात आहे. सलमान खानने त्याच्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, तो २०२२ च्या अखेरीस ‘दबंग ४’ चे शूटिंग सुरू करू शकतो. तिग्मांशु धुलिया या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत आणि कदाचित ते या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील सांभाळतील.

याआधी तिग्मांशूने ‘पान सिंग तोमर’ आणि ‘साहेब बीवी और गँगस्टर’ सारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहेत, ज्यात दबंग मालिकेसारखीच क्रिएटिव्ह जागा होती. तिग्मांशुने ‘दबंग ४’ दिग्दर्शित केल्यास या चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा आणखी वाढतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या