28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनसमंथा रुथ प्रभूची पुन्हा तब्येत बिघडली; शूटिंग केले रद्द

समंथा रुथ प्रभूची पुन्हा तब्येत बिघडली; शूटिंग केले रद्द

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – ‘ओम अंटावा’ फेम अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची दक्षिण आणि उत्तरेतही जोरदार फॅन फॉलोईंग आहे. ‘पुष्पा : द राईज’नंतर अभिनेत्री अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. सामंथा रुथ प्रभूबद्दल मीडियामध्ये बातम्या येत आहेत की, समंथाने यावेळी तिच्या चित्रपटांचे शूटिंग थांबवले आहे आणि ती सार्वजनिक ठिकाणी येणे देखील टाळत आहे. एका वृत्तानुसार, समंथा आरोग्याच्या गंभीर समस्यांनी त्रस्त असून ती उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.

समंथा ‘पॉलीमॉर्फ्स लाईट इराप्शन’ नावाच्या त्वचेच्या आजाराशी झुंज देत आहे, जो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने होतो. असे म्हटले जात आहे की समंथा सध्या ब्रेकवर असून डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने स्वत:ला सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले आहे.

रिपोर्टनुसार, समंथा रुथ प्रभूने तिच्या ‘खुशी’ चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचे शूटिंगही पुढे ढकलले आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत काम करत आहे.

सोशल मीडियावरून गायब
सोशल मीडियावर सक्रिय असलेली समंथा ब-याच दिवसांपासून काहीही शेअर करत नाही. तिने ३१ जुलै रोजी तिचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. याशिवाय तिने तिच्या आगामी ‘यशोदा’ चित्रपटाचा टीझर शेअर केला, तेव्हापासून सोशल मीडियावर अभिनेत्रीचे कोणतेही अपडेट दिसले नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या