मुंबई : बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली आहे. पण त्याच्या फिटनेसबाबत बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सांगितले गेले होते की संजय दत्तच्या तब्येतीची काळजी लक्षात घेता त्याच्या सिनेमात ऍक्शन सीन कमी असतील. हेदेखील म्हटले गेले होते की संजय दत्त कदाचित कधीच चित्रपटात ऍक्शन सीन करू शकणार नाही. हीच भीती निर्मात्यांना वाटत होती. पण नेहमीप्रमाणे वाईट काळात स्वत:ला सिद्ध करून दाखवणा-या संजय दत्तने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे.
संजय दत्त सध्या आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो आहे. तो चित्रपटात कोणतीही तडजोड करायला तयार नाही. तो प्रत्येक सीनमध्ये जीव तोडून काम करतो. त्यामुळे त्याला ऍक्शन सीन करायला काहीच हरकत नाही. केजीएफ २मध्ये मुख्य भूमिका साकारणारा यशने संजय दत्तची खूप प्रशंसा केली. तो म्हणतो की इतकी उर्जा असणारा दुसरा व्यक्ती मी पाहिला नाही. संजय दत्त तर ऍक्शन सीनच्या माध्यमातून स्क्रीन फाडून टाकेल.
भारत, मोदींचा विरोध हा पाकिस्तानमधील सर्वात आवडता