23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गेल्या काही दिवसांपासून रक्तदाबासंबंधी काही समस्या जाणवत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

खार येथील हिंदुजा रुग्णालयात सायरा बानू यांना दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू लागल्या होत्या. आता त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. सायरा बानू लवकरात लवकर ब-या व्हाव्यात यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. सायरा बानू या दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची काळजी घेत होत्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या