23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeमनोरंजनजेष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचे निधन

जेष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचे निधन

एकमत ऑनलाईन

नागपूर : जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचे निधन झाले आहे. ७९ व्या वर्षी त्यांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. शनिवारी दुरापी १२ वाजता त्यांच्या प्रार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुलाकडे नागपूरमध्येच राहत होते.

राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.
या सिनेमांना दिले संगीत

पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.

राम-लक्ष्मण नावामागची गोष्ट
जेव्हा विजय पाटील मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची आॅफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले.

केंद्र वारंवार चुक करतेय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या