24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनशाहरुखने सांगितले होते बॉयकॉटचे फायदे

शाहरुखने सांगितले होते बॉयकॉटचे फायदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षक बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांमुळे नाराज आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. दरम्यान, शाहरुख खानचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख खानने चित्रपटांवरील बहिष्काराचे फायदे सांगितले आहेत. भारतात खूप प्रेम मिळाल्याचे म्हटले आहे. बॉयकॉट करून जे खूश आहेत ते आमच्यामुळे खूश आहेत, असेही शाहरुख खान म्हणाला होता.

आतापर्यंत बॉयकॉटवर अनेक कलाकारांच्या नव्या-जुन्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. दरम्यान, शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शाहरुख खान कोमल नाहटाच्या शोमध्ये बोलत आहे. ‘कधी कधी हे चांगले असते. चित्रपट तेवढा चालला नाही तर निमित्त राहते बॉयकॉट टाकला म्हणून चालला नाही. चित्रपट चांगला होता पण सामाजिक बहिष्कारामुळे चालला नाही’ असे शाहरुख खान म्हणाला होता.

कोमल नाहटाला शाहरुख म्हणतो, मी वा-याने हलणार नाही. वा-याने झाडे हलतात. भारतात माझ्यावर जेवढे प्रेम केले जाते, तेवढे प्रेम खूप कमी लोकांवर केले जाते. लोकांना योग्य-अयोग्य समजते. मला वाटत नाही की त्याचा माझ्यावर किंवा माझ्या चित्रपटावर कधी परिणाम झाला किंवा होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या