‘रॉकेटरी’ या चित्रपटात शाहरुख खान जर्नालिस्टच्या भूमिकेत

362

मुंबई, बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान बऱ्याच काळापासून चित्रपटात झळकलेला नाही. त्याचा गतवर्षी ‘झिरो’ हा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला होत. त्यानंतर शाहरूखने न ही कुठला चित्रपट साइन की चित्रपटाची घोषणा केली. दरम्यान, तो राकेश शर्माच्या ‘सारे जहां से अच्छा’ या बायोपिकमध्ये काम करणार असल्याची चर्चा होती. पण नंतर त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून शाहरुखच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

शाहरुखने अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली आहे. याशिवाय आर. माधवनच्या ‘रॉकेटरी’ चित्रपटातही तो पाहुणा कलाकार म्हणून काम करणार आहे. हा चित्रपट इस्रोचे जगप्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक नाम्बी नारायणन यांच्या जीवनावर आधारित असलेला बायॉपिक आहे. या दोन्ही भूमिकांचे शूट शाहरुखने गतवर्षी केले आहे.

विशेष म्हणजे ‘रॉकेटरी’ या चित्रपटात शाहरुख खान एका जर्नालिस्टची भूमिका साकारत आहे. जो नाम्बी नारायणन यांची मुलाखत घेतो आणि चित्रपटाची कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. यात माधवनही नासातील एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, शाहरुखने गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल 20हून अधिक स्क्रिप्ट वाचल्या आहेत; परंतु या सर्व स्क्रिप्ट त्याने रिजेक्‍ट केल्या आहेत.

Read More  उस्मानाबाद जिल्ह्यात आज नव्याने ६ कोरोना बाधितांची वाढ