23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजन‘ब्रह्मास्त्र’मधील शाहरूखचा बॉडी डबल सोशल मीडियावर चर्चेत

‘ब्रह्मास्त्र’मधील शाहरूखचा बॉडी डबल सोशल मीडियावर चर्चेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आलिया-रणबीरसोबतच या चित्रपटात अनेक कलाकारांच्या छोट्या छोट्या भूमिका आहेत. बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरूख खान याची देखील या चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. या चित्रपटातील भूमिकेमुळे शाहरूख खान प्रचंड चर्चेत आहे. पण सध्या शाहरूख खानपेक्षा त्याचा बॉडी डबल चर्चेत आला आहे.

सध्या शाहरूख खानचा बॉडी डबल हसित सवानीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉडी डबल हसित सवानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि हसित सवानी एकाच कपड्यात आणि एकाच लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत हसित सवानीने इन्स्टा कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ब्रह्मास्त्र’मधील दिग्गज शाहरूख खानच्या कॅमिओसाठी त्याचा स्टंट डबल म्हणून करताना खूप मजा आली.’

‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरूख खान ‘वानरस्त्रा’च्या भूमिकेत कॅमिओ आहे. तो एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसला आहे. शाहरूखसोबतच्या स्टंट डबलचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. बॉडी डबल आणि स्टंट्सच्या जगात हसित सवानी हे एक मोठे नाव आहे. हसितने केवळ टीव्ही आणि बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही काम केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या