22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमनोरंजन‘चला हवा येऊ द्या’मध्ये शहाजी बापू पाटील वोक्केत झळकणार

‘चला हवा येऊ द्या’मध्ये शहाजी बापू पाटील वोक्केत झळकणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय बंड हे देशभरात चांगलेच चर्चेत होते. या बंडादरम्यानच आमदार शहाजी बापू पाटील यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल झाली. या ऑडिओ क्लीपमधील त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या डायलॉगवर सोशल मीडियावर प्रचंड मीम्स व्हायरल झाले.

इतकेच नव्हे तर त्यावर इन्स्टाग्रामवर रिल्सही बनू लागले. शिंदे गटातील सांगोल्याचे हे आमदार शहाजी बापू पाटील आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात झळकणार आहेत. या एपिसोडचे शूटिंग नुकतेच मुंबईतील स्टुडिओत पार पडले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत यावेळी त्यांच्या पत्नी रेखाताई पाटीलसुद्धा उपस्थित होत्या. या शूटिंगदरम्यानचे फोटो समोर आले असून प्रेक्षकांमध्ये या एपिसोडची उत्सुकता निर्माण झाली आहे.

थुकरटवाडीत शहाजी बापू पाटील हे कोणता नवीन डायलॉग मारतील आणि कोणते गौप्यस्फोट करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांचा कधीही न पाहिलेला पैलूदेखील या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. पुढील आठवड्यात हा एपिसोड प्रसारित होण्याची शक्यता आहे.

शहाजी बापू पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि या मतदारसंघाची ओळख दुष्काळी भाग म्हणून आहे. त्यामुळे आसाममधील झाडी आणि डोंगर पाहून शहाजी बापूंना आनंद झाल्यास नवल नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या