21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनसलमानच्या चित्रपटातून शहनाजला बाहेरचा रस्ता?

सलमानच्या चित्रपटातून शहनाजला बाहेरचा रस्ता?

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंजाबची ‘कतरिना कैफ’ शहनाज गिल हिचा बॉलिवूड डेब्यू होणार आहे म्हटल्यावर चाहते खुश होते. पण ताजी बातमी शहनाजच्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पाडणारी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर भाईजान अर्थात सलमान खानने आपल्या चित्रपटातून शहनाजला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून शहनाजचा डेब्यू होणार होता. यामुळे शहनाजचे चाहते आनंदात होते. पण आता कदाचित शहनाजच्या बॉलिवूड डेब्यूचे स्वप्न भंगले आहे. सलमानने तिला चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा आहे. सलमानने असे का केले, याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण याचदरम्यान शहनाजने जे काही केले ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शहनाज चित्रपटातून बाहेर पडताच तिने रागाच्या भरात सलमान खानला सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सांगितले जात आहे की, सलमानला अनफॉलो केल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, या वृत्तावर आतापर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून आणि शहनाजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, शहनाज गिल ‘कभी ईद कभी दिवाली ‘मधून बाहेर पडलेली नाही. शहनाज या चित्रपटातून बाहेर पडण्याची बातमी खोटी आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या