कोलकाता : सुपरस्टार शाहरुख खान सध्या ‘पठाण’च्या यशाचा आनंद घेत आहे. अलीकडेचकिंग खान देखील त्याचा क्रिकेट संघ विराट कोहलीच्या संघाविरुद्ध खेळताना पाहण्यासाठी तो कोलकात्यातही गेला होता. तेथे त्याने अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली. यादरम्यान शाहरुख त्याची मुलगी सुहाना खान आणि शनाया कपूरसोबत स्पॉट झाला होता.
दरम्यान, , सामना संपल्यानंतर, बॉलीवूडच्या बादशाहने कोलकाता येथे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली आहे. ज्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत आणि चाहते किंग खानचे खूप कौतुक करत आहेत.
शाहरुखच्या फॅन क्लबने कोलकाता येथील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबत अभिनेत्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अभिनेता काळ्या शर्टमध्ये आणि रिप्ड जीन्समध्ये डॅपर वाइब्स देताना दिसत आहे.
यादरम्यान सुपरस्टार सर्वांसोबत आनंदी पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर शाहरुख खानची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. शाहरुखने त्याच्या व्यस्त वेळापत्रकात अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींची भेट घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं कौतुक करत आहेत.