22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमनोरंजनशाहरूखने माझी लव्ह लाईफ खराब केली

शाहरूखने माझी लव्ह लाईफ खराब केली

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. आजही असेच काहीसे झाले आहे. नुकतेच स्वरा भास्करने एका माध्यमाला मुलाखत देताना शाहरुख खानवर आपली लव्ह लाईफ खराब करण्याचा आरोप लावला आहे.

स्वरा म्हणाली की, मी आदित्य चोप्रा आणि शाहरूख खानला आपली लव्ह लाईफ खराब करण्याला जबाबदार समजते. कारण मी फार कमी वयात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट पाहिला होता. तेव्हापासून मी राजच्या प्रेमात पडले होते.

त्यामुळे माझ्या ख-या आयुष्यातही मला माझा राज भेटेल या प्रतीक्षेत मी अनेक वर्षे घालवली. परंतु वय वाढत गेलं आणि लक्षात आलं की, ख-या आयुष्यात राजसारखा कुणीच नाहीय. असे मजेशीर उत्तर देत स्वराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सोबतच तिने असेही म्हटले की, सिंगल राहणे फारच कठीण आहे. आणि जोडीदार शोधणे म्हणजे कचरा चाळण्यासारखे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या