21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनशाहरूखचा ‘पठाण’ नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर

शाहरूखचा ‘पठाण’ नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या दोन्ही सिनेमांना सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला. आता अशातच शाहरूखच्या ‘पठाण’चाही सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे. नेटकरी ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याची मागणी का करत आहेत? यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पण अनेक युजर्स यामागे दीपिका पदुकोण हे कारण असल्याचे म्हणत आहेत. आमिरला भूतकाळातील काही वक्तव्यं भोवली आणि सोशल मीडियावर बायकॉट ‘लाल सिंग चड्ढा’ ट्रेंड झाला. अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमाचीही तीच गत झाली. ‘रक्षाबंधन’च्या लेखिका कनिका ढिल्लो यांच्या एका हिंदूविरोधी जुन्या ट्विटमुळे नाराज असलेल्या नेटक-यांनी सोशल मीडियावर बायकॉट ‘रक्षाबंधन’ ट्रेंड केला.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये नवनवे सिनेमे रिलीज होत आहेत. पण प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. रिलीजआधीच सोशल मीडियावर या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. आता आणखी एका आगामी चित्रपटाला विरोध सुरू झाला आहे.

होय, ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ यानंतर शाहरूख खानचा ‘पठाण’ नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर आला आहे. ट्विटरवर बायकॉट ‘पठाण’ ट्रेंड होत आहे.

दीर्घकाळानंतर शाहरूख ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. पण त्याच्या या कमबॅक चित्रपटाला प्रदर्शनाआधीच जोरदार विरोध होताना दिसतोय. ‘नेक्स्ट मिशन बायकॉट ‘पठाण’ असं एका युजरने लिहिलं आहे. ‘मिशन स्टार्स, बायकॉट पठाण,’ असे अन्य एका युजरने लिहिले आहे.

‘पठाण’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत दीपिका पदुकोण लीड रोलमध्ये आहे. अशात काही लोकांनी दीपिकाच्या जेएनयू भेटीचा मुद्दा उकरून काढला आहे. दीपिकाला ‘देशद्रोही’ ठरवत, लोक ‘पठाण’ चा विरोध करत आहेत.
‘पठाण’ हा सिनेमा पुढच्या वर्षी (२५ जानेवारी) चित्रपटगृहांत धडकणार आहे. या चित्रपटातील शाहरूखचा लुकही समोर आला आहे. शाहरूखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण चित्रपटाच्या रिलीजच्या इतक्या महिन्याआधीच सोशल मीडियावरचे चित्रपटाविरोधातील वातावरण तापले आहे. साहजिकच मेकर्सचे टेन्शन वाढले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या