28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनशाहरुखचा मुलगा अबरामने घेतले लालबागचा राजाचे दर्शन

शाहरुखचा मुलगा अबरामने घेतले लालबागचा राजाचे दर्शन

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशभरात गणेशाचे आगमन झाले आहे. सर्वांनी आपापल्या घरी बाप्पाची मूर्ती स्थापन केली आहे. सर्वसामान्य असो की सेलिब्रेटी प्रत्येकजण भक्तीत रमताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणेच सलमान खानच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. शाहरुख खानच्या लहान मुलाचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अबराम खान मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी आल्याचे व्हीडीओत दिसत आहे. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अबराम खान हा लालबागचा राजा मंदिरात पांढरी टी-शर्ट, जीन्स आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसला. तो आपल्या नातेवाईकांसह मंदिरात गेला होता. यादरम्यान तो पूजा करतानाही दिसला. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहत्यांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने अबराम खानने तरी देवाचे दर्शन घेतले हे चांगले आहे अशी कमेंट केली. दुस-याने तो किती क्यूट आहे, असे लिहिले. अबराम खान पब्लिक एरियामध्­ये कमीच दिसतो. ईद, दिवाळीसारख्या मोठ्या प्रसंगी वडील शाहरुख खानसोबत मन्नतच्या घराच्या टेरेसवरून तो सर्वांचे आभार मानताना दिसतो. अबराम व्यतिरिक्त शाहरुख खानला आर्यन खान नावाचा मोठा मुलगा आहे. मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या