मुंबई : सोनी टीव्हीवर येणारा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. आता त्यात शैलेश लोढा यांच्याही नावाचा समावेश आहे. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते साधूच्या वेशात दिसत आहेत.
दरम्यान तारक मेहताचे पात्र त्यांनी साकारले आणि ते घराघरांत लोकप्रिय केले. या मालिकेचा चाहता वर्ग तगडा आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सारेच या मालिकेचा आनंद घेतात मात्र या शोमधून अनेक कलाकार बाहेर पडले ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांचे मनोरंजन केले होते. सध्या शैलेश आणि शोच्या निर्मात्यांमध्ये बराच वाद सुरू आहे. शुल्काबाबत काही तरी गैरसमज झाला असल्याचे बोलले जात आहे.
शैलेश यांनीच त्याचा लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो एका मंदिरातील आहे जिथे शैलेश हे जमिनीवर बसून ध्यानात मग्न झालेले दिसत आहेत. त्यांनी संन्याशांचे भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत आणि त्यांच्या कपाळावर भस्मही लावले आहे. या दरम्यान ते एकाग्रतेने ध्यान करताना दिसत आहेत.
या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मनाची शक्ती द्या, मन जिंका… त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर भरपूर कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांचा असाही समज आहे की, ‘शैलेश यांनी संन्यास तर घेतला नाही.?’