मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्काचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने आता या सिनेमाच्या शूंिटगला सुरुवात केली आहे. अनुष्का ‘झिरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण ‘चकदा एक्सप्रेस’ या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का आता कमबॅक करणार आहे.
‘चकदा एक्सप्रेस’ हा क्रीडा विषयक सिनेमा आहे. या सिनेमात अनुष्का वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामींच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्काने सोशल मीडियावर ‘चकदा एक्सप्रेस’ सिनेमाच्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधीच अनुष्काने सिनेमावर काम करायला सुरुवात केली आहे. या सिनेमासाठी अनुष्का खूप मेहनत घेत आहे.
‘चकदा एक्सप्रेस’ हा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा बायोपिक आहे. या सिनेमासाठी अनुष्काने खूप मेहनत घेतली आहे. अनुष्काचे ट्रेंिनग दरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनुष्काच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.