Saturday, September 23, 2023

केंद्र सरकारच्या जाहिरातीचं शुटींग : लॉक़डाऊनमध्ये अक्षय कुमार सेटवर

कमालिस्तान स्टुडिओमध्ये चित्रिकरण : जाहिरातीचं दिग्दर्शन करतोय आर. बाल्की
दोन महिन्याच्या ब्रेकनंतर चित्रिकरणासाठी सेटवर आलेला अक्षय कुमार पहिला अभिनेता

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचे चित्रिकरण करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दोन महिन्याच्या ब्रेकनंतर चित्रिकरणासाठी सेटवर आलेला तो पहिला अभिनेता आहे. खंरतर अक्षय कुमारने या जागतिक संकटात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मग अक्षय कसा काय लॉकडाऊनच्या काळात चित्रिकरण करतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात येणं सहाजिकच आहे.

Read More  धक्कादायक खुलासा : दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2000 मुंबई टेस्ट, कोचीन वनडे सामने फिक्स

तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे एक जाहिरातीचं शुटींग असून ही जाहिरात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी चित्रीत करण्यात येत आहे. हे चित्रिकरण सुरू असताना सगळ्यांनी मास्क घातलं होतं. त्याचबरोबर सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकरोपणे पालन करण्यात आलं..या जाहिरातीचं दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केलं असून मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओमध्ये याचं चित्रिकरण करण्यात आलं.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या