24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनश्रद्धा कपूर-टायगर श्रॉफ पुन्हा एकत्र

श्रद्धा कपूर-टायगर श्रॉफ पुन्हा एकत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई – बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना ऑनस्क्रीन प्रचंड पसंत करण्यात आले आहे. यातीलच एक जोडी म्हणजे श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ही होय.

या जोडीने ‘बागी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. चाहते टायगर आणि श्रद्धाला पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा सतत व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच श्रद्धा आणि टायगर एकत्र झळकणार आहेत.

ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल. गेली बरेच दिवस श्रद्धा पडद्यापासून दूर आहे. परंतु सध्या श्रद्धा पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी तयार आहे. श्रद्धा कपूरकडे सध्या एकापेक्षा एक बिग बजेट चित्रपट आहेत.
आगामी काळात ती लव रंजनच्या एका चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. तसेच ‘चालबाज इन लंडन’, ‘नागिन’, ‘स्त्री २’ यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे. दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरलाही अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा टायगरसोबत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या रिमेकसाठी श्रद्धाला अप्रोच करण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार, टायगरसोबत या चित्रपटात श्रद्धाने काम करावे अशी निर्मात्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. तसेच, निर्मात्यांना टायगर आणि श्रद्धाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा परत आणायची आहे. याआधी श्रध्दा कपूर आणि टायगर श्रॉफची जोडी एप्रिल २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी’मध्ये दिसली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या