मुंबई : श्रद्धा कपूर सध्या स्पेनमध्ये अभिनेता रणवीर कपूरसोबत लव रंजनच्या आगामी चित्रपटाचे शूंिटग करत आहे. या चित्रपटाचे शूंिटग पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा ‘स्त्री’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.
या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि अभिनेता राजकुमार राव यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘स्त्री’ हा चित्रपट श्रद्धा कपूरच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. ‘स्त्री’ चित्रपटाचा पहिला सिक्वेल २०१८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यामुळेच आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याचा विचार केला आहे.
ऑगस्टपर्यंत शूटिंग होणार सुरू
या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजानने या चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत रूही चित्रपट बनवला होता. तसेच वरूण धवन आणि कृति सेनन नंतर भोडिया चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर आता ते श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ चित्रपटाचा दुसरा सिक्वेल सुद्धा तयार करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धा कपूरने या भूमिकेसाठी होकार दिलेला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत चित्रपटाच्या शूंिटगला सुरूवात होणार आहे.