25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनसिद्धांतने १५ वर्षांचा संसार मोडून केला होता रशियन मॉडेलशी विवाह

सिद्धांतने १५ वर्षांचा संसार मोडून केला होता रशियन मॉडेलशी विवाह

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे काल शुक्रवारी वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झाले. जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने टीव्ही जगताला मोठा धक्का बसला आहे. सिद्धांत सूर्यवंशी गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होते आणि ते एक प्रसिद्ध नाव होते. पाच वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

सिद्धांतने दोन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव इरा सूर्यवंशी आहे. जवळपास १५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. २०१५ मध्ये हे जोडपे वेगळे झाले.

घटस्फोटानंतर दोन वर्षांनी सिद्धांतला रशियन मॉडेल आणि अभिनेत्री भेटले. २०१७ मध्ये त्याने रशियन मॉडेल रशियन मॉडेल अलेसियाशी दुसरे लग्न केले.

सिद्धांतप्रमाणेच अलेसियाचंही हे दुसरे लग्न होते. तिचे आधी अलेक्झांडर यानोव्स्कीशी लग्न झाले होते पण काही काळानंतर दोघे वेगळे झाले. अलेसियाला पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे. तिची मॉडलिंगच्या जगतात खूप नाव आहे. ती एक फॅशन कोरिओग्राफर देखील आहे. टीव्हीच्या अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती दिसली आहे. रोहित शेट्टीच्या फियर फॅक्टर खतरों के खिलाडी सीझन ४ मध्ये देखील तिने भाग घेतला होता.

सिद्धांतलाही दोन मुले आहेत. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून दीजा नावाची मुलगी आहे जी १८ वर्षांची आहे. तर त्याला दुस-या पत्नीपासून एक मुलगा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या