25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजन...म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब

…म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अनेकवेळा ती टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसोबत स्पॉट झाली आहे. पण ती फिल्मी लाइम लाइमपासून ती लांब असल्याने तिच्यावर अनेक सवाल उपस्थित करण्यात येतात. दरम्यान, तिनं तिच्या फिल्मी जगाबद्दल खुलासा केला आहे.

अथियाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना फिल्मी लाइम लाइमपासून लांब असण्यावर खुलासा केला आहे. ती नव्या गोष्टी शिकत आहे. अनेकवेळा कलाकारांना हरण्याची भीती असते, पण माझ्याबाबतीत तसे होत नाही. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. असे वक्तव्य अथियाने यावेळी केले आहे.

माझ्या मते प्रत्येकाने तेच काम केले पाहिजे ज्याच्यातून त्यांना आनंद मिळतो. बहुतांश लोक केवळ अ‍ॅक्टिंगवर आपलं लक्ष केंद्रित करतात. माझ्यासाठी पहिलं प्रेम अभिनय आहे. मात्र, मी अभिनयासोबत एका कंपनीमध्ये काम करत आहे. त्या कंपनीची मी फॅशन डायरेक्टर आहे. मी त्यातून नव्या गोष्टी शिकत आहे. त्यामुळे मी मोठ्या पडद्यापासून लांब असल्याचे अथियाने म्हटलं आहे.

अथिया शेट्टीने सलमान खानच्या ‘हीरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अथिया २०१७ मध्ये आलेल्या ‘मुबारकान’ व २०१९ मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत अखेरची दिसली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या