22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमनोरंजनसोनाली कुलकर्णी चा दुबईत साखरपुडा!

सोनाली कुलकर्णी चा दुबईत साखरपुडा!

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या चाहत्यांना आनंदी बातमी दिली आहे. तिने आपला स्वत:चा साखरपुडा (एंगेजमेंट) झाल्याचं आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून जाहीर केलं आहे.उद्योगपती कुणाल बोनोडेकर याच्याशी तिचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आहे. घरातल्या सगळ्या लोकांशी उपस्थित हा सोहळा दुबाईमध्ये पार पडला. फेब्रुवारी महिन्यात तिने एक फोटो शेअर करत एका नव्या आयुष्याला सुरूवात करतीये, असं म्हटलं होतं. त्याचसोबत त्या फोटोमध्ये कुणालला देखील तिने टॅग केलं होतं. तेव्हापासून ती कुणालबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

२ फेब्रुवारी २०२० रोजी हा साखरपुडा पार पडला. मात्र आपल्या वाढदिवशी सोनालीने ही शुभ वार्ता आपल्या चाहत्यांना तसंच महाराष्ट्राला दिली आहे. पेशाने उद्योगपती असलेल्या कुणालशी तिने आता उर्वरित आयुष्य घालवण्याचं ठरवलं आहे.

सोनालीचे ट्विट ‘आमचा 02. 02. 2020 ला साखरपुडा झाला… आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…!!!’

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या