21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनसोनालीच्या लग्नाचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर

सोनालीच्या लग्नाचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी -कुणालचा लग्नसमारंभ लंडन येथे पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हीडीओ कुठेच झळकले नव्हते परंतु तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. येत्या ११ ऑगस्ट रोजी हा लग्नसोहळा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर पाहायला मिळणार आहे.

सनई-चौघडे, फुलांच्या रंगीबेरंगी माळा, लग्नमंडप, जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा, पाहुण्यांची लगबग, जेवणात मराठमोळा बेत, हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले होते. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली असून कधी हा सोहळा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर पाहता येईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हीडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. येत्या ११ ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

याविषयी सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘‘आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही होते. परंतु कोरोना महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केले. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. सर्वांसोबत हे शेअर करायचे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखे उत्तम ओटीटी मला मिळाले, ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.’

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या