25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनसोनम आणि आनंद यांच्या बाळाचे नाव वायू कपूर आहुजा

सोनम आणि आनंद यांच्या बाळाचे नाव वायू कपूर आहुजा

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोनम कपूरने वयाच्या ३७व्या वर्षी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. सोनम आणि आनंद आहुजा यांनी २० ऑगस्ट रोजी आपल्या घरी मुलाचे स्वागत केले. सोनम आणि तिचा मुलगा पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. सोनम आणि आनंद यांच्या मुलाचं नुकतंच बारसंही झालं. सोनमने एक खास पोस्ट शेअर करत तिच्या मुलाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचे नाव वायू कपूर आहुजा असे ठेवलेय.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असल्यापासूनच चर्चेत आहे. २० ऑगस्टला तिने मुलाला जन्म दिला. तमाम बॉलिवूडकरांनी सोनम-आनंदचे अभिनंदन केले. अनिल कपूरही आजोबा झाला, म्हणून खुश आहे. सध्या सोनम आणि आनंद आपली नवी भूमिका एन्जॉय करत आहेत. पहिल्यांदाच आई बाबा झाल्याने ते आनंदात आहेत.

सोनमने हिंदू धर्मात वायू शब्दाला असलेले महत्त्व सांगत, या नावाचा अर्थही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इतर सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनी खूप छान नाव आहे, असे म्हणत सोनमच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या