22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमनोरंजनआशियातील टॉप ५० सेलिब्रेटींमध्ये सोनू सूद अव्वल

आशियातील टॉप ५० सेलिब्रेटींमध्ये सोनू सूद अव्वल

एकमत ऑनलाईन

मुंबई : लंडनमधील एका मॅगेझिनने आता सोनूच्या कामाची दखल घेतली आहे. आशियातील टॉप ५० सेलिब्रिटींमध्ये सोनू पहिल्या नंबरवर आहे. लंडनमधील ‘ईस्टर्न आय’ या साप्ताहिकाने आशियातील टॉप ५० सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाºया लोकांवर मोठ संकट ओढावले होते़ लाखो लोक बेरोजगार झाले आहेत.

अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. यात सोनू सूदचा पहिला नंबर लागला आहे. ज्यांनी आपल्या कामातून समाजात वेगळी ओळख तयार केली आणि लोकांना प्रेरीत केले अशा सेलिब्रिटींची ही यादी आहे. या यादीत पहिले स्थान मिळाल्यानंतर सोनूने आभार मानले आहेत. आपल्या देशातील नागरिकांची मदत करणं हे माझे कर्तव्य आहे़ हे लॉकडाऊन काळात मला लक्षात आले असे तो म्हणाला आहे.

स्टारशिप रॉकेटचा स्फोट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या