17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeमनोरंजनदाक्षिणात्य अभिनेत्री चित्राची आत्महत्या

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्राची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चित्राच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती केवळ २८ वर्षांची होती. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केले होते. चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघे एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने आत्महत्या केली. चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला. नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचे हेमंतने सांगितले. ‘शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवले. पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला’, अशी माहिती हेमंतने पोलिसांना दिली.

शौविक चक्रवर्तीवरील आरोप गैरलागू; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या