23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजनदाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंद्र चंद्रशेखरन विवाहबद्ध

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंद्र चंद्रशेखरन विवाहबद्ध

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : दक्षिणेचे चित्रपट निर्माते रविंदर चंद्रसेकर यांनी गुरुवारी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मीसोबतशी विवाह केला. रविंदर चंद्रसेकर आणि महालक्ष्मी यांच लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी खासगी समारंभात लग्नाची विधी पूर्ण केली. लग्नासाठी जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना आमंत्रित केले होते. लग्नाच्या चित्रांमध्ये महालक्ष्मी पती रवींद्रचा हात धरून पारंपरिक लाल जोडप्यात दिसत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करीत महालक्ष्मीने लिहिले, मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आला. तू प्रेमाने माझे आयुष्य भरले आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करताच मित्र आणि चाहते शुभेच्छा देत आहेत. काही युजर्सनी नववधूला चंद्राचा तुकडा म्हटले आहे. तर काहींनी ही जोडी खूपच क्यूट दिसते, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या