मुंबई : होळीचा रंग बॉलिवूडमध्येही दिसू लागला आहे. स्टार होळीच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. सिनेमांबाबत सांगायचं तर अनेक कहाण्यात आहेत. ज्यांवर होळीचा खास प्रभाव बघायला मिळाला. होळीचे काही दृश्य चित्रपटाला वेगळेच वळण देतात.
‘दामिनी’मध्ये ‘होळी‘ टर्निंग पॉइंट
राजकुमार संतोषी यांनी १९९३ मध्ये सुपरहिट सिनेमा ‘दामिनी’ घेऊन आले होते. या सिनेमात सनी देओल, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत होते. सिनेमाचा टर्निंग पॉइंट होळीच होता. होळीच्या मस्ती दरम्यान बलात्काराची घटना घडते आणि सिनेमाची कहाणी वळण घेते.
रडले होते हेमा-अमिताभ
बीआर चोप्रा यांचा २००३ मध्ये ‘बागबां’ सिनेमा आला होता. हा कौटुंबिक सिनेमा लोकांना खूप आवडला होता. सिनेमातील ‘होली खेले रघुबीरा अवध में.’ गाण्याच्या सीननंतर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी रडले होते.
होळीनंतर आले होते डाकू
रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ सिनेमात हेमा मालिनी, जया भादुरी, अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र आणि अमजद खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले होते. सिनेमात ‘होली के दिन दिल मिल.’ गाण्याचं शूट सुरू असताना खरे डाकू तिथे आहे होते.
रेखा-अमिताभचे नाते आले समोर
१९८१ मध्य सिलसिला सिनेमा आला होता. या सिनेमाची खूप जास्त चर्चा झाली आजही होते. पण सिनेमातील सगळ्यात खास सीन होता ‘रंग बरसे भीगे चुनरवाली.’ गाणं. या गाण्यात रेखा आणि अमिताभ यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली होती. दोघांच्या भूतकाळावरून यावेळी पडदा उठला होता.