28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home मनोरंजन बिग बी यांची प्रकृती स्थिर, मानले कोविड योद्धांचे विशेष आभार

बिग बी यांची प्रकृती स्थिर, मानले कोविड योद्धांचे विशेष आभार

एकमत ऑनलाईन

महानायक अमिताभ बच्चन व ज्युनिअर बी अभिषेक बच्चन याना कोरोनाची लागण झाली असून दोघांनाही काल रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या दोघांनाही याबाबत सोशल मिडियावर माहिती ‘काळजी करु नका’ असा संदेश आपल्या चाहत्यांना दिला.

ANI ने दिलेल्या ताज्या वृत्तानुसार , अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याचे नानावटीच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितले आहे. सध्या त्यांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.

या दरम्यान बिग बींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी नानावटीच्या डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व कर्मचा-यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांच्यासह देशभरातील कोविड योद्धांना देवाची उपमा देत ते करत असलेल्या महान कार्याचे कौतुक केले आहे. त्यासोबतच माझी प्रकृती स्थिर नानावटीतील कर्मचारी माझी नीट काळजी घेत आहेत. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करु नका, असा संदेशही त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे.

याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या बच्चन, जया बच्चन याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असेही बिग बींनी सांगितले आहे.

Read More  कोरोनाची लागन : महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या