29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजन‘सामी सामी’ गाण्यावर स्पायडर मॅनही थिरकला

‘सामी सामी’ गाण्यावर स्पायडर मॅनही थिरकला

एकमत ऑनलाईन

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असलेला ‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमातील गाणी, अल्लू अर्जुनची स्टाईल याची प्रेक्षकांवर चांगलीच छाप पडली आहे. या सिनेमातील सामी सामी आणि ऊं अंटावा या गाणी प्रेक्षकांना खूपच आवडली आहेत. केवळ प्रेक्षकांना नाही तर चक्क स्पायडर मॅन देखील या गाण्यांचा चाहता झाला आहे.

अल्लू शिरीषने सामी सामी या गाण्यावर स्पायडरमॅन डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, स्पायडर मॅन देखील पुष्पा च्या रा रा सामी गाण्यावर डान्स करत त्याचे यश साजरा करत आहे. स्पाइडरचा चाहता असल्याच्या नात्याने…वाह! हा भारत आहे बॉस. स्पायडर मॅन खूपच जबरसदस्त दोस्ता!’
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पायडर मॅनचा ड्रेस घातलेली एक व्यक्ती ‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिका मंदाना हिचे डान्स स्टेप करत आहे. त्याच्या आजूबाजूचे लोकही या गाण्यावर नाचत आहेत. स्पायडर मॅनने ज्या पद्धतीने सामी सामी गाण्यावर हुकस्टेप करत आहे, त्याचे सर्वजण भरभरून कौतुक करत आहे.

‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा लाल चंदनाची तस्करीवर आधारीत आहे. यामध्ये अल्लू अर्जुनने पुष्पा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सिनेमा १७ डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने ८१.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या