36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमनोरंजनअमेझॉन इंडियाच्या प्रमुखांना ‘सर्वोच्च’ दिलासा

अमेझॉन इंडियाच्या प्रमुखांना ‘सर्वोच्च’ दिलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि ओव्हर दि टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्ममधील कंटेन्टच्या संदर्भात केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमात फारसा दम नसून या नियमांद्वारे कुणावर खटला दाखल करता येऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अमेझॉन इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुराणिक यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.

अमेझॉन इंडिया प्राईमवर प्रदर्शित झालेल्या तांडव वेबसिरीजमध्ये हिंदू समाजाला दुखवणारे कंटेन्ट असल्याचा आरोप झाला होता. यासंदर्भात अमेझॉन प्राईमसह, वेबसिरीजचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांसह देशाच्या विविध भागात गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर प्रकरणात अटक होऊ नये, यासाठी अमेझॉन इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुराणिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. सरकारने याबाबत कायदा करून त्याची अंमलबजावणी करणेसुध्दा आवश्यक आहे, असे सांगत न्यायालयाने पुराणिक यांना अटकेपासून दिलासा दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी पुराणिक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

भारतात तिस-या लसीला मंजुरी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या