19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमनोरंजनतब्बू लावत नाही आडनाव ?

तब्बू लावत नाही आडनाव ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री तब्बू ही बॉलिवूडची शानदार अभिनेत्री. १९८२ साली फिल्मी करिअर सुरू करणा-या तब्बूने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तब्बूने अद्यापही लग्न केले नाही, ती आपल्या नावासोबत आपले आडनाव लावत नाही. खरे तर तिच्याबद्दल असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. पण तब्बूला तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे आवडत नाही आणि त्यामुळे तिच्याबद्दल फारसं कोणालाच ठाऊक नाही.

अनेकांना तिचे आडनाव माहीत नाही. तिच्या वडिलांचे नाव ठाऊक नाही. असं का? त्यामागे एक मोठी कहाणी आहे.
तब्बूचे आडनाव हाश्मी आहे. पण तिने कधीच हे आडनाव वापरले नाही. सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत तब्बू स्वत: यावर बोलली होती. ‘मला कधीच माझ्या वडिलांचे नाव व त्याचे आडनाव वापरण्याची गरज वाटली नाही’, असे ती म्हणाली होती.

ती म्हणाली होती, मी माझी आई आणि आजी-आजोबा (आईचे आई-वडील) यांच्यासोबत मोठी झाले. हैदराबादेत आजी-आजोबांसोबत माझे बालपण मजेत गेले. माझ्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी आजी-आजोबांसोबत राहू लागले. माझी आई एक शिक्षिका होती.

त्यामुळे मी आजीसोबत जास्त वेळ घालवायची. माझे आजी-आजोबा दोघंही देवाला मानायचे. धार्मिक पुस्तकं वाचायचे. लहानपणी मी खूप भित्री होते. काहीच बोलायचे नाही. आज अभिनेत्री बनल्यानंतरही मी बोलू शकत नाही.’ लवकरच तब्बूचा ‘दृश्यम २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याशिवाय ‘कुत्ते’, ‘खुफिया’ आणि ‘भोला’ या चित्रपटांत ती दिसणार आहे. आजच ‘द क्रू’ या तिच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. यात तिच्यासोबत करिना कपूर व क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या