25.4 C
Latur
Tuesday, May 18, 2021
Homeक्राइमसुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची -अंकिता लोखंडे

सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची -अंकिता लोखंडे

एकमत ऑनलाईन

अंकिताच्या या जबाबानंतर आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता त्याची  एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने खळबळजनक खुलासे केले आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं.

बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चर्कवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबाब नोंदवण्यासाठी आज बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचले. गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला.

यावेळी अंकिताने तिच्या जबाबात रियाबाबत अनेक खळबळजनक गोष्टी सांगितल्या. ‘मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांत ने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं’, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली. तसेच, त्यानंतरही अनेकदा सुशांतचे आणि माझ्या व्हॉट्सअॅप्पवर गप्पा झाल्या. यावेळीही सुशांत रियाबाबत सांगत होता, असंही अंकिताने सांगितलं. अंकिताच्या या जबाबानंतर आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता आहे.

Read More  अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘विजय सत्याचाच’, असं ट्वीट केलं

रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘विजय सत्याचाच’, असं ट्वीट केलं. अंकिताने केवळ ‘विजय सत्याचाच’ इतकेच लिहिलेला फोटो ट्वीट केला आहे. त्याला कोणताही संदर्भ किंवा हॅशटॅग, मेन्शन नाही. मात्र, सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रियाविरोधात गुन्हा दाखल होताच अंकिताने ट्वीट केल्यामुळे चाहत्यांनी हा संदर्भ जोडला आहे.

अंकिता लोखंडेचं ट्वीट –

रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ‘रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले’ असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

 रियाच्या घरी बिहार पोलीस जाणार असल्याची माहिती

गुन्हा दाखल झाल्यानंतर रियाने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी केली आहे. मुंबईतील सांताक्रुझमध्ये असलेल्या रियाच्या घरी बिहार पोलीस जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रियाने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनाची तजवीज केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करु शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या