23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनसुष्मिता सेन-रोहमन शॉलचे पुन्हा पॅचअप?

सुष्मिता सेन-रोहमन शॉलचे पुन्हा पॅचअप?

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक ललित मोदी यांच्याशी नातेसंबंधांमुळे सुष्मिता सेन सतत चर्चेत आहे. एकीकडे ललित मोदी बिनधास्त सुष्मितावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सुष्मिता सेनने या प्रकरणावर अद्याप मौन बाळगले आहे. मात्र आता सुष्मिता सेन ही पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुळे चर्चेत आली आहे. रोहमन शॉल आणि सुष्मिता सेनचे पुन्हा एकदा पॅचअप झाल्याचे बोलले जाते आहे.

सुष्मिताने नुकताच तिची आई शुभ्रा सेन यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. या फॅमिली पार्टीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सुष्मिता तिची आई, मुली आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसत आहेत. रोहमनचे सुष्मिता, मुलींसोबत चांगलं बॉन्डिंग आहे आणि ते व्हीडीओमध्येही स्पष्टपणे दिसत आहे.

व्हीडीओमध्ये रोहमन शॉल सुष्मिता सेनच्या मुलींसोबत मस्ती-मस्करी करताना दिसत आहे. सुष्मिता सेनचा हा व्हीडीओ लाईव्ह सेशनमधील आहे. हा व्हीडीओ पाहून सुष्मिताचे काही चाहते खुश आहेत, तर रोहमनला सुष्मिताच्या फॅमिली पार्टीमध्ये पाहून काहींच्या भुवया उंचावल्या आहेत.

कारण, काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर सुष्मिताने तिचे रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून ललित मोदींशी असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आहे. मात्र या व्हीडीओनंतर त्या दोघांचे पॅचअप झाल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या