26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनसुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. रोहमन शॉल मॉडेल म्हणून काम करतो. मात्र, नशीब अचानक चमकल्याने त्याला थेट चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचा एक फोटो शेअर करून आपले नाते जगजाहीर केले.

ललित मोदी यांच्या पोस्टनंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. काहींनी या नात्यावर टीका केली तर काहींनी समर्थन करत प्रेमाला वयाची मर्यादा नसल्याचे म्हटले होते. हे सर्व प्रकरण शांत होत असतानाच आता सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंडविषयी महत्त्वाची बातमी पुढे येत असून लवकरच सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

रोहमन शॉल मॉडेल म्हणून काम करतो. मात्र, नशीब अचानक चमकल्याने त्याला थेट चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. मॉडेलिंगमध्ये रोहमनने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण नक्कीच केली आहे. आता आपले नशीब चित्रपटसृष्टीत आजमावण्यासाठी रोहमन तयार आहे. मात्र, रोहमन शॉल नेमक्या कोणत्या चित्रपटात काम करणार हे अद्याप कळू शकले नाही. रोहमन शॉल चित्रपटात काश्मिरी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या