23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीय'कांचना ३' अभिनेत्री अलेक्झांडरचा संशयास्पद मृत्यू

‘कांचना ३’ अभिनेत्री अलेक्झांडरचा संशयास्पद मृत्यू

एकमत ऑनलाईन

पणजी : दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार राघव लॉरेन्सच्या कांचना ३ चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केलेल्या अभिनेत्री अलेक्झांडर जावी हिचे निधन झाले आहे. अलेक्झांडर भाड्याने राहत असलेल्या गोव्यातील एका अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला. एनएनआयने शुक्रवारी एका अहवालात दोन महिलांच्या मृत्यूची माहिती दिली होती, परंतु त्यावेळी त्यापैकी एक अभिनेत्री अलेक्झांडर असल्याचे उघड झाले नाही. ही माहिती सोमवारी उघड झाली आहे़

अहवालानुसार, पोलिसांना अलेक्झांडरचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेला आढळला. अलेक्झांडरने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे, परंतु तपासकर्ते सध्या पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. शवविच्छेदनासाठी आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी अलेक्झांडरकडे कोणीही नसल्यामुळे गोवा पोलिसांनी रशियन दूतावासाला पोस्टमार्टमची कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी औपचारिक शिष्टमंडळ नेमण्यास सांगितले आहे.
शवविच्छेदनासाठी कुटुंबियांच्या संमतीची प्रतिक्षा
रशियन वाणिज्य दूतावासाने माध्यमांना सांगितले की अलेक्झांडरच्या पोस्टमार्टमची प्रक्रिया त्याच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतरच पूर्ण केली जाईल. उत्तर गोव्याचे एसपी शोभित सक्सेना यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला या प्रकरणी कोणत्याही गैरप्रकाराची भीती वाटत नाही. तथापि, आम्ही दूतावासाच्या रशियन प्रतिनिधींच्या निवेदनाद्वारे आणि वैद्यकीय-कायदेशीर परीक्षेद्वारे मृत्यूच्या कारणावर अंतिम निर्णय घेऊ.

२४ वर्षीय अलेक्झांडर व्यतिरिक्त, पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाची ओळख ३४ वर्षीय एकटेरिन तितोवा आहे. ही दोन भिन्न प्रकरणे आहेत. गुरुवारी एका रशियन महिलेचा मृतदेह आणि शुक्रवारी दुस-या महिलेचा मृतदेह सापडला. एसपी म्हणतात की दोन्ही प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

लातूरचा मृत्यूदर देशापेक्षा अधिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या