मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या मात्र स्वरा चर्चेत आहे ते तिच्या लग्नामुळे. तिने काही दिवसांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले होते. तर आता तिने अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे आणि प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी जवळचेच काही नातेवाईक आणि मित्र-परिवार यांच्या उपस्थितीत आपले पारंपरिक लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो स्वरा भास्करने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केले आहेत. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले.
पण हैराण करणारी गोष्ट एक समोर आली आहे की स्वराने आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नसून ते इन्स्टा स्टोरीत शेअर केले आहेत. यामध्ये ती मरून आणि गोल्डन कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिने यासोबत मरून ज्वेलरी देखील परिधान केलेली आहे.
हाताला मेहेंदी, लाल चूडा, नाकात नथ, माथ्यावर पट्टी आणि केसात गजरा घालून स्वरा खूपच सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे फहादने स्ट्रिप्ड सफेद कुर्ता आणि त्यावर गोल्डन नेहरू जॅकेट घातले आहे.