22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमनोरंजनतापसी कंगनाची ‘स्वस्त कॉपी’- एकता कपूर

तापसी कंगनाची ‘स्वस्त कॉपी’- एकता कपूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तापसी पन्नूला टार्गेट करणे सुरूच ठेवले आहे. तिने तिला तिची ‘स्वस्त कॉपी’ देखील म्हटले आहे. आता एकता कपूरने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

एकता कपूर तिच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी दिसली. या चित्रपटात तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तापसी पन्नू नुकतीच शाहरुख खानसोबत डंकी की चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.

एकता कपूर व्यतिरिक्त दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी दिसला होता. एका मुलाखतीदरम्यान कंगना रणौतने तापसी पन्नूला तिची स्वस्त कॉपी म्हटले होते, जेव्हा निर्माती एकता कपूरला या दोन अभिनेत्रींनमधील फरकाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, दोघींमध्ये केवळ साम्य हे आहे की दोघी अतिशय अप्रतिम अभिनेत्री आहेत आणि दोघींना एकमेकांविरुद्ध लढवणे हे आमचे काम नाही.

एकता कपूर पुढे म्हणाली की, मला या अभिनेत्रीनंसोबत काम करायला आवडते, जर कोणताही मनोरंजक प्रोजेक्ट आला तर मी या दोघींकडे पहिले जाते. मला अशा चांगल्या कलाकारांसोबत काम करायला आवडते. कंगना आणि तापसी या दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या