23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजन‘भोला’च्या सेटवर तब्बूला अपघात

‘भोला’च्या सेटवर तब्बूला अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे ‘भोला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला अपघात झाला आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अजय देवगणच्या या चित्रपटामध्ये तब्बू ही एका पोलिस अधिका-याची भूमिका करत आहे. शूटिंगच्या वेळी स्टंट करताना तिला अपघात झाला. त्यात तिला दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बूच्या डोक्याला आणि डोळ्याला दुखापत झाली आहे.

आपल्या हटक्या आणि प्रभावी अभिनयामुळे तब्बूने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. आजवर तिने वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली आहे. यापूर्वी देखील अजय देवगणच्या अनेक चित्रपटांमध्ये तब्बूने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ती त्याच्या ‘भोला’ नावाच्या चित्रपटामध्ये एका पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगच्या दरम्यान एका घनदाट जंगलातून तब्बू ट्रक चालवत होती. काही चोर तिचा पाठलाग करत होते. त्या दरम्यान एका चोराच्या दुचाकीचा धक्का ट्रकला लागला. यावेळी तब्बूला गाडी आवरणं कठीण झालं. त्यात ट्रकची काच फुटून तिला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

त्या काचेच्या तुकड्याने तब्बूच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने मोठा अपघात झाला नसून तब्बूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या