मुंबई : ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू ही सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अजूनही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकते मग ते अभिनयाच्या बाबतीत असो किंवा सौदर्यांच्या बाबतीत. मात्र तिच्या सर्वच चाहत्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे इतकी प्रसिद्ध आणि देखणी असूनही तब्बूने लग्न का केलं नाही.
परंतु एका मुलाखतीत तब्बूने आपल्या लग्न न होण्याचे कारण अजय देवगण असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सिने अभिनेत्री तब्बूचे नाव अनेक अभिनेत्यांब
रोबर जोडले गेले आहे, परंतु तिचे एकही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. तब्बूच्या दमदार अभिनयाचे लोक वेडे आहेत. वयाच्या ५२ व्या वर्षीही तब्बू चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आहे.
तब्बूला सर्वांत जास्तवेळा तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका मुलाखतीत तब्बूने लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे. यात तब्बूने पुन्हा तिचे लग्न न करण्याचे कारण अजय देवगण असल्याचे सांगितले.
बॉलिवूडमध्ये अशा काही ठराविक जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यात तब्बू आणि अजय देवगण यांच्या जोडीचा समावेश होतो. त्यांचं बॉन्डिंगही खास आहे. तब्बू आणि अजय देवगण यांनी कधीकाळी एकमेकांना डेटही केले होते. त्यानंतर अजयने काजोलशी लग्न केले. मात्र तब्बू अजूनही अविवाहित आहे.