31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमनोरंजनताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा-सुबोध भावे

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा-सुबोध भावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौत आणि राज्य सरकारमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनानं ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर सातत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत परतू नये यासाठी धमकी दिली होती, असा खळबळजनक आरोप कंगनानं केला होता. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. पण, तिनं राऊत यांच्यावर टीका करताना मुंबईचा अपमान करणारं विधान केलं होतं आणि त्यावरून ती ट्रोल झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनंही कंगनाला स्पष्ट शब्दात सुनावलं.

संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.त्याला सुबोध भावेनं उत्तर दिलं. ”ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!,” अशा शब्दांत भावेनं तिला खडेबोल सुनावले.

स्वारातीम विद्यापीठात ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या