16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजनतमन्ना भाटिया बिझनेसमनशी करणार लग्न?

तमन्ना भाटिया बिझनेसमनशी करणार लग्न?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकते. तमन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तमन्ना ही एका मुंबईतील बिझनेसमनशी लग्न करणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नाच्या चर्चेवर आता तमन्नाने मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लग्नाबाबत सांगितले. ‘हा माझा बिझनेसमन पती आहे.’ अशी पोस्ट तमन्नाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तमन्ना ही एका बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे, अशी पोस्ट एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आली. त्यानंतर तमन्नाने या पोस्टला उत्तर देत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तमन्नाने लिहिले, ‘हा माझा बिझनेसमन पती आहे’ या पोस्टमध्ये तमन्ना ही एका मुलाच्या लूकमध्ये दिसत आहे.

तमन्नाने ही पोस्ट शेअर करताना ‘मॅरेज रुमर्स’ अशा हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. तमन्नाने लग्नाबद्दल पसरलेल्या अफवांना या पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या